भारत राजमुद्रा दर्पण | आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,२५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या धातूची किंमत ४७,४५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. चांदी ५९,४०० रुपये प्रति किलोने विकली जात असून, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या किंमती देशभर बडकात असतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,४५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,५२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,५२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,३२० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,५२० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५९४ रुपये आहे.
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासून घेऊ शकतो, त्याच बरोबर काही फसवेगिरी असल्यास तक्रार देखील करू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. २४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.