नोएडा राजमुद्रा दर्पण | देशाला हादरवणारी एक घटना समोर आली आहे, जिथे एका 80 वर्षीय इसमाला गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दररोज सातत्याने बदलणाऱ्या या जगामध्ये गुन्ह्यांची परिभाषाही बदलत चालली आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये ही घटना घडली, जिथे पोलिसांनी एका 80 वर्षीय इसमाला Digital Rape च्या आरोपाखाली अटक केली. हा व्यक्ती गेल्या 7 वर्षांपासून एका अल्पवयीन मुलीवर डिजिटल रेप करत होता.
मॉरिस रायडर म्हणून ओळखल्या जाणार्या या व्यक्तीवर पीडितेसोबत हे कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 (बलात्कार), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि POCSO कायद्याच्या कलम 5 आणि 6 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कृत्याचा विरोध केल्याने आरोपी पीडितेला मारहाणदेखील करत होता. संबंधित प्रकरणाचा तपास चालू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.