पालघर राजमुद्रा दर्पण | ऑनलाईन गेम पबजी( PUBG )याची क्रेझ अजूनही लहान मुले आणि तरुणांमध्ये दिसून येते. परंतु या गेममुळे मुलांमध्ये हिंसा, आक्रमकता, मोबाईलचे वेड आणि व्यसनाधीनता वाढत चालली आहे. काहीजण या गेम मुळे स्वतःचे प्राण गमावून बसले तर काहींनी आपले मानसिक स्वास्थ बिघडवून घेतले. त्यामुळे गेमवर बंदी आणण्याची मागणी देशभरातून होत होती. याची गंभीर दखल घेत केंद्रसरकारने या गेमवर बंदी आणली होती.
पण बंदी असतानाही तरुण आणि लहान मुलं पबजी गेम खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पब्जी खेळताना अपघात झाल्याचा एक धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे.
पब्जी खेळने पालघर मधल्या शिरगाव इथल्या एका 16 वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले आहे . शादान शेख असे या बळकाचे नाव असून तो आपल्या मित्रांसोबत शिरगाव इथल्या एका अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीवर पबजी खेळत होता. मात्र तो या पब्जी खेळण्यात इतका गुंतला की तो इमारतीच्या गच्चीच्या टोकावर कधी आला त्याला कळलंच नाही. खेळता खेळता हा बालक खाली पडला. यात तो गंभीर जखमी. झाला आहे. जखमी शादानवर सध्या पालघर मधील रिलीफ रुग्णालयात उपचार सुरू आहेत .