एरंडोल राजमुद्रा दर्पण | “शांति भीतर से आती है इसे बाहर मत खोजो।” हे बुद्धांचे अनमोल वचन. 16 मे बुद्ध जयंती, यानिमित्त श्रावस्ती पार्क येथे सकाळी सात वाजता बुद्ध जयंती उत्सव समिती मार्फत अभिवादन सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळेस मोठ्या प्रमाणात एरंडोलवासी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एरंडोल शहरातील ज्येष्ठ आंबेडकरी नेते शालिग्राम दादा गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमांना माल्यार्पण करून सामाजिक कार्यकर्ते ईश्वर भाऊ बिऱ्हाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार व हिरालाल महाजन यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. भरत शिरसाठ यांनी त्रिशरण, पंचशील, बुद्ध पूजा व प्रास्ताविक सादर करून कार्यक्रमास सुरुवात केली. कार्यक्रमावेळी भरत शिरसाठ लिखित ‘सत्यशोधक आणि इतर कथा’ आणि वर्षा शिरसाठ लिखित ‘त्यागमूर्ती माता रमाई’या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला शालिग्राम दादा गायकवाड ईश्वर भाऊ बिऱ्हाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार व प्रकाश तामस्वरे आण्णा यांनी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक नरेंद्र तायडे यांनी आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी विमलबाई रामोशी, मीरा सपकाळे, कमलबाई बाविस्कर, प्रवीण केदार, भगवान ब्रम्हे, रघुनाथ सपकाळे, मीना ब्रम्हे, चिंतामण जाधव, मनीषा जाधव, मुकेश ब्राम्हणे, सुभाष अमृतसागर,रमा ब्राम्हणे, निंबा खैरनार, अलका खैरनार, प्रकाश शिंदे, जयश्री अमृतसागर, वर्षा शिरसाठ व मोठ्या प्रमाणावर शहरातील नागरिक उपस्थित होते.