जळगाव राजमुद्रा दर्पण | जळगाव शहरात १५ मे रोजी उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील उद्योजकांचा स्मार्ट उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माळी साम्राज्य समता विचार फाउंडेशन यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जळगावमधील अर्चना ब्युटी पार्लर च्या संचालिका अर्चना माळी यांचादेखील स्मार्ट उद्योजक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे सन्मानचिन्ह राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक मुरलीधर महाजन, जळगाव जनता बँकेचे राजेश महाजन, नाशिक येथील उद्योजक कमलाकर चौधरी, संध्या माळी, जिल्हा परिषद सदस्य नाना भाऊ महाजन, नगरसेविका सरिता नेरकर, यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अर्चना माळी यांना स्मार्ट उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.