अहमदनगर राजमुद्रा दर्पण | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनीनजिक एसटी आणि कारचा अपघात झाला आहे. या अपघातात अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप थोडक्यात वाचले.
संग्राम जगताप यांच्या कारचा अक्षशः भुगा झाला आहे. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. आमदार जगताप हे मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला असून, मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. आमदार संग्राम जगताप हे आपल्या मर्सिडिज कारमधून मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. एसटी बससोबत झालेली ही धडक अतिशय भीषण होती. यामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान करचे खूप खराब हल झाले आहे. कारमधील एअरबँगही उघडल्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट स्पश नाही मात्र, कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.