जळगांव राजमुद्रा दर्पण | शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आग्रही असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या टाळंटाळीमुळे नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागणार आहे.
शासनाने दिलेल्या ४२ कोटींपैकी १६ कोटी निधीतील रस्त्यांची कामे सुरु करण्याचा अळथडा दूर झाला असला तरी, मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी या तारखेच्या पुढची तारीख खेळ चालविला आहे. त्यामुळे डांबरी रस्त्यांचे काम मार्गी लागण्याची शक्यता दिसून येत आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरातील रस्त्यांच्या विविध विकास कामांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. त्यापैकी ४२ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली होती. परंतु या निधीला अनेक अडचणी आल्या असून कोरोना काळात राज्यशासनाने देखील या निधीला स्थगिती दिली होती.
दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व मनपातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निधीवरील स्थगिती उठवली, त्यानंतर मिळालेल्या निधीतून काही कामांमध्ये बदल करून रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आला.आता मनपा प्रशासनाकडे बँकेच्या चेकबुकची मागणी केली असून, चेकबुक मिळाल्यानंतर पैशांचे वर्गीकरण केले जाणार आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये वेळ गेला तर रस्त्यांचे काम पूर्ण होणार नाही आणि शहरवासीयांना पुन्हा चिखलातून वाठ काढत जावे लागणार आहे.