मुंबई राजमुद्रा दर्पण | मी महाविकास आघाडीचा बाबरीचा ढाचा पाडणार असे विधान फडणवीसांनी मुंबई मध्ये नुकत्याच पार पडलेल्या सभेत केले होते. यावर सुप्रिया सुळेंनी ‘ मी या विधानामुळे घाबरले ‘ असा टोमणा मारला. सुप्रिया सुळेंच्या बोलण्यामुळे पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा खा. सुप्रिया सुळे आज जिल्हा दौर्यावर होत्या. या दौर्यात त्यांच्या नेतृत्वाखाली महागाई विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत पत्रकार परिषदेत खा. सुळे यांनी संवाद साधला. खा. सुप्रिया सुळे यांना फडणवीस यांनी मुंबईत केलेल्या विधाना बद्दल विचारले असता त्यांनी फडणवीसांना टोमणा मारत उत्तर दिले. यावेळी त्या म्हणाल्या कि, देवेंद्र फडणवीस यांच्या मी महाविकास आघाडीचा बाबरी ढाचा पडणार या विधानामुळे मी घाबरले आहे.
केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याबदल्यात मोदी सरकारने महागाईचे गिफ्ट देशातील जनतेला दिले असल्याची टिका खा. सुप्रिया सुळे यांनी केली. इंधन दरवाढीच्या विषयात राज्य सरकारचे कर मुळात केंद्रापेक्षा कमी असल्याचा खुलासा त्यांनी केला. केंद्र सरकार सेसच्या माध्यमातून करवसूली करते परंतु जनतेला सुविधा देत नाही. दुसऱ्या कोणत्याची विषयापेक्षा महागाई हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. महागाई संदर्भात आम्ही सरकारला चर्चेची विनंती केली आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नाही.