जळगाव राजमुद्रा दर्पण | खोटेनगर परिसरात असलेल्या शिव फर्निचर या दुकानाला अचानक आग लागली. अंदाजे मध्यरात्री २.३० च्या सुमारास अचानक फर्निचरने पेट घेतल्याने ही भीषण आग पेटली. यावेळी कोणालाही जीवित हानी अथवा वित्तहानी झाली नाही.
यावेळी मनपाच्या महाबळ, गोलाणी मार्केट अग्निशमन विभागाचे बंब लागलीच घटनास्थळी बोलावण्यात आले. सकाळी ५ वाजेपर्यंत १२ बंब रिकामे झाले, त्यानंतरच आग शांत झाली. जळगाव मनपाचे सहाय्यक अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, मुख्य फायरमन अश्वजीत घरडे, रोहिदास चौधरी, भारत बारी, वाहन चालक देविदास सुरवाडे, वाहन चालक संतोष तायडे, संजय भोईटे, वाहन चालक प्रदीप धनगर, सरदार पाटील, भगवान पाटील, वसंत कोळी, जगदीश साळुंखे या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी मदत केली.
आग काशी लागली हे अजून पर्यंत समजले नाही परंतु, या आगीत व्यावसायिकाचे खूप मोठे नुकसान झाले असल्याचे समजते आहे. तर दुसरीकडे स्वतः अग्निशमन दल देवडुटसारखे धाऊन आले हे नाकारता येणार नाही. जर वेळेवर अग्निशमन दल पोहोचले नसते तर आगीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नसते आणि होत्याच नव्हत झालं असत.