मुंबई राजमुद्रा दर्पण | SBI म्हणजेच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी चालून आलेली आहे. स्टेट बँकेने चॅनल मॅनेजर फेसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी), चॅनल मॅनेजर सुपरवायजर एनिटाईम चॅनल (सीएमएस-एसी) आमि सपोर्ट ऑफिसर-एनिटाईम चॅनल्स (एसओ-एसी) या पदभरतीसाठी अर्ज मागवले आहेत.
या पदांसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आणि पात्र उमेदवारांनी एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी १८ मेपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १८ मे २०२२ पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ७ जून २०२२ इथपर्यंत आहे. भरती प्रक्रियेतून भरली जाणारी रिक्त पदे चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी) – ५०३ चॅनल मॅनेजर सुपरवायझर एनिटाइम चॅनल (सीओएमएस-एसी) – १३०सपोर्ट ऑफिसर – एनिटाइम चॅनल्स (एसओ-एसी)- ८ इत्यादी आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडे पदशी संबंधित पात्रता असली पाहिजे.
वेतनश्रेणी चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी) -३६ हजार दरमहाचॅनल मॅनेजर सुपरवायझर एनिटाइम चॅनल (सीएमएस-एसी) – ४१ हजार रुपये दरमहासपोर्ट ऑफिसर – एनिटाईम चॅनल्स (एसओ-एसी) ४१ हजार रुपये दरमहा इतकी असेल. उमेदवाराची वयोमर्यादा ही 60 वर्षांपर्यंत आहे.