मुंबई राजमुद्रा दर्पण | हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनचरित्र दाखवणारे छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आले. या प्रदर्शनाला युवासेना आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या जीवनशैलीचे वर्णन करून दिले
बाळासाहेब आणि पवार साहेबांची घट्ट मैत्री त्यांच्या काळापासून होतीच आणि म्हणून त्या मैत्रीचे रूपांतर युतीत झाले. या महविकास आघाडीची युती बघायला मोठे साहेब असायला पाहिजे होते असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.कारण, त्यांच्याबरोबर मी राहिलो. मला राजकारणात रस होता. मी त्यांच्या बरोबर दौऱ्याला जात असे. म्हणजे एक क्षण असा होता की एक निवडणूक जिंकलो होतो. चौथ्या दिवशी माझी परीक्षा होती. मी आईला न सांगताच वडिलांबरोबर दौऱ्याला निघून गेलो. आईचा फोन आला, अरे तू कुठे गेला परवा तुझी परीक्षा आहे.
राजकारणात ही सगळी मंडळी अग्रेसर होती, पुढे होती. मग महाजन असतील, मुंडे साहेब असतील. त्यावेळचे राजकारण खूप वेगळे होते. राजकीय स्टेजवरून टोकाची टीका,आरोप- प्रत्यारोप व्हायचे. पण पातळी सोडून कुणी खाली गेले नाही. मैत्री विसरले नाहीत. खोट्या केसेस, गुन्हे दाखल करणे कधीच झाले नाही.
आज मोठे साहेब ( बाळासाहेब) असते तर त्यांना या युतीमुळे जास्त आनंद झाला असता. कारण त्यांच्या मित्राबरोबर युती आणि एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राला एकत्र चालवण्याचे काम शिवसेना करीत आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.