मुंबई राजमुद्रा दर्पण | सध्या बंगालच्या उपसागरात र्नैऋत्य मोसमी पाऊस पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार असल्याचे हवामान खात्याने सांगितलं आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने महाराष्ट्रातही काही भागात पावसाची दाट शक्यता आहे. यंदा नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी म्हणजे 16 मे रोजी मोसमी वारे सक्रिय होऊन अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला.
पुढील दोन ते चार दिवसांत मोसमी पाऊस दक्षिण अरबी समुद्रापर्यंत येतील अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ही सर्व परिस्तिथी असताना जरी लवकरच मान्सूनचे आगमन होणार असले तरी, विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटा निर्माण होत विदर्भातील अमरावती आणि अकोल्यात 21 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे.