जळगांव राजमुद्रा दर्पण | पेट्रोल, डिझेल मध्ये झालेली दरवाढ केद्रा सरकारने मागे घ्यावी या साठी शहरात शिवसेनेकडून महागाई विरोधात अनोलान करण्यात आले. या मागणीसाठी शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात पाचोऱ्यामध्ये महागाई विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
यावेळी शिवसेनेकडून केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल -डिझेल, गॅस, भाजीपाला, खाद्य तेल तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून महागाई कमी करू, रोजगार वाढवू” अशा भूलथापा मारत जनतेला “अच्छे दिन” चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु, आज महागाई गगनाला भिडत असताना मोदी सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही.
केंद्र सरकारने जनतेच्या विश्वासघात केला आहे. म्हणूनच जनतेचे जबाबदारी प्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच अच्छे दिनाचे गाजर जनतेला दाखवून देशाची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्र सरकारचा निषेध म्हणून पाचोरा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिक्षक सेना, अल्पसंख्यांक सेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीने महागाईची व केंद्र सरकारची प्रतीकात्मक महागाई अंत्ययात्रा आज शनिवारी २१ रोजी सकाळी १०:३० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आली.