मुंबई राजमुद्रा दर्पण | ड्रग्ज सारख्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 864 किलो कफ सिरपच्या बाटल्या जप्त करत मुंबईच्या नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो विभागाने पुन्हा एकदा एक मोठी कामगिरी केली आहे. एकूण 8640 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. कंट्रोल ब्युरो अर्थातच NCB मुंबईने भिवंडी इथून हा सर्व माल ताब्यात घेण्यात आला आहे. या कफ सिरपचा वापर ड्रग्ज सारख्या नशेसाठी केला जातो. यावेळी NCB मुंबईने एक बोलेरो आणि दुचाकीसह दोन व्यक्तींना अटक केली.
आग्रा- मुंबई महामार्गावरून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ डसिरापची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती NCB मुंबईला त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. मुंबई NCB च्या एका पथकाने भिवंडीजवळ आग्रा-मुंबई महामार्गावर पारख ठेवली आणि एक बोलेरो पिकअप अडवली.
गाडीची झडती घेतली असता वाहनातील 60 बॉक्समध्ये एकूण 864 किलो कोडीन आधारित कफ सिरप पद्धतशीरपणे ठेवलेले आढळून आले व वाहनचालकाची चौकशी केली असता ही औषध नशा करण्यासाठी पुरवली जाणार असल्याची माहिती समोर आली.
एक गाडी पकडल्यानंतर दोन तासांनंतर औषधं घेऊन जाण्यासाठी दुसऱ्या गाडीला पकडण्यासाठी मुंबई NCB ने सापळा रचला. NCB पथकाने सुमारे 2 किलोमीटर पायी पाठलाग करत औषधं घेण्यासाठी आलेल्या गाडीला पकडले. ही औषधे मुंबई आणि ठाण्यातील विविध भागांमध्ये मादक पदार्थ म्हणून पुरवले जाणार होते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषध नशा करण्यासाठी वापरली जाणार असल्याचे समोर आले आहे.