नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | (CCI) कडून भरतीसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे अभियंता आणि अधिकारी पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जून करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार सीसीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्जाशी संबंधित माहिती जाणून घेऊ शकतात.
अधिसूचनेनुसार, 46 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती आयोजित करण्यात आली असून, ज्यामध्ये 27 रिक्त पदे अभियंता पदासाठी आहेत आणि 17 रिक्त जागा अधिकारी पदासाठी आहेत. चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या पदासाठी एक जागा रिक्त आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ पीडब्ल्यूडीच्या उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागणार नाही.
भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी सीसीआयच्या वेबसाइट www.cciltd.in वर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा. फॉर्म भरावा आणि आवश्यक कागदपत्रांसह मॅनेजर (एचआर), सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट बॉक्स क्रमांक: 3061, लोधी रोड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली : 110003 या पत्त्यावर पाठवा. इच्छुकांनी आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे….