मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. अपक्ष आमदारांच्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्री यांनी ही ऑफर दिल्याची माहिती दिली होती. विचारासाठी दोन दिवसांची मुदत संभाजीराजे यांना दिली होती. मात्र संभाजीराजेंनी ही ऑफर फेटाळली असे सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे उद्या संभाजीराजे उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार नाही, असे समजते आहे.
उद्धव ठाकरे यांनी उद्या दुपारी 12 वाजता ‘वर्षा’ इथं शिवबंधन बांधण्यासाठी येण्याचा निरोप दिला होता. त्यामुळे छत्रपती संभाजी राजे काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. पण शिवसेनेची ही ऑफर संभाजीराजे यांनी नाकारली आहे.
शिवसेना शिष्टमंडळाने आज संभाजीराजे छत्रपती यांची मुंबईतल्या ट्रायडंट हाँटेलमध्ये भेट घेतली. या शिष्टमंडळात शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता.
या भेटीत शिवसेना शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी 12 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचे निमंत्रण संभाजीराजे छत्रपती यांना दिले होते.