यावल राजमुद्रा दर्पण | वृक्ष तोड केल्याप्रकरणी सरकारने अनेक कायदे कानुन तयार केलेले आहे, परंतु या कायद्याचे भय नसल्याचा प्रकार घडला आहे.
यावल तालुक्यातील भर दिवसा वृक्ष ए प्रकरण समोर आले आहे. अनेक शेतकरी तोंडी व लेखी तक्रारी करत असूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
यावल येथील योगेंद्र प्रदीप महाजन (गट क्रमांक ८४२), दिनेश श्रावण बोरसे यांनी (गट क्रमांक २०९४) शेतातील हिरवळीने भरलेले जिवंत वृक्षतोडीबाबत पोलिस ठाणे, तहसील कार्यालय व वनपरिक्षेत्र कार्यालयात संबंधित प्रकरणबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.