जळगाव राजमुद्रा वृत्त सेवा । जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे, कोरोनाचे रुग्ण संस्ख्या झपाट्याने वाढत असून जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर यासाठी कार्यरत आहे. आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. मात्र ह्याच दरम्यान मोठा अनर्थ होताना टळला आहे, रुग्णालयामध्ये बी पॉझिटिव्ह रुग्णाला एबी पॉझिटिव्ह रुग्ण नोंद करून त्याला एबी पॉझिटिव्ह प्लाझ्मा देण्यात येत होता मात्र ऐनवेळी उपमहापौर कुलभूषण पाटील याना संबंधित घटनेची माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय गाठून रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला व घटना उघडकीस आणली आहे, या प्रकरणी उप अधिष्ठाता डॉ पोटे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हि चूक रुगणल्याच्या टेक्निशियन ची असल्याचे कबूल केले यापुढे असा गैरप्रकार घडता कामा नये अशा सूचना उप महापौर कुलभूषण पाटील यांच्या कडून देण्यात आल्या आहे.
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या समयसुचकतेमुळे होणारा अनर्थ टळला आहे, यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी उप महापौर कुलभूषण पाटील यांनी केलेल्या सहकार्या बद्दल समाधान व्यक्त केले मात्र या प्रकरणाची चर्चा दिवसभर वैद्यकीय महाविद्यालयात रंगली होती.
घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून रुग्णालय प्रशासन उपमहापौरांना किती गंभीरतेने घेते याकडे आता पहावे लागणार आहे,