पाचोरा राजमुद्रा दर्पण | एका दलित अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना पाचोरा मधील कळमसरा येथे काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, अशी मागणी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.
तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी मुली व महिलांनवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या निर्दयी नराधमांना फाशीची शिक्षेची अंमलबजावणी करावी जेणेकरून महिला व लहान मुलींवरील वारंवार होत असलेले अन्याय अत्याचाराला आळा बसेल.
यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ही महिला असावी यासाठी देखील मागणी करण्यात आली आहे. राज्याला महिला मुख्यमंत्र्याची नितांत गरज आहे. यावेळी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक भानुदास पवार व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शेरखान उपस्थित होते.