टेक्सास राजमुद्रा दर्पण | अमेरिकेतील टेक्सासमधील शाळेत भीषण गोळीबार झाला आहे. या हल्ल्यामध्ये 18 मुलांचा विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे समजते आहे. एवढेच नाही तर 3 शिक्षकांचाही मृत्यु झाला आहे . टेक्सासच्या गव्हर्नरने याबाबत माहिती दिलीये.
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी गोळीबाराची घटना टेक्सासमधील उवाल्डे शहरात घडल्याची माहिती दिलीये. याठिकाणी 18 वर्षीय शूटरने रॉब एलिमेंटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या. आरोपी शूटरने हल्ला केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली.
या 18 वर्षीय शूटरने अचानक शाळेच्या कॅम्पसमध्ये प्रवेश केला. पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ फोर्स घटनास्थळी पाठवण्यात आलं. यावेळी मुलांच्या पालकांना कॅम्पसमध्ये न जाण्याचं आवाहन केलं गेलं. ग्रेग अॅबॉट यांनी हा हल्ला धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. या आरोपी शूटरने दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना लक्ष्य केलं. पोलीस घटनास्थळी उपस्थित असून जखमींना रुग्णालयात उपचार दिले जातायत.
या गोळीबारात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळालेली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सध्या राज्यपालांच्या आदेशानंतर टेक्सासच्या रेंजर्सनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून स्थानिक पोलिसांकडून सहकार्य घेतले जात आहे.