मुंबई राजमुद्रा दर्पण | आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे! स्पाईस जेटवर सायबर हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रॅन्समवेअरच्या हल्ल्यामुळे सकाळी उड्डाणांचा खोळंबा झाला. स्पाईस जेटच्या आयटी टीमकडून तत्काळ सिस्टीम नियंत्रणात आणली गेली. आता स्पाईस जेटची उड्डाणे सुरळीत सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
काल रात्री स्पाईसजेटने रॅन्समवेअर हल्ल्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे सेवा ठप्प झाली होती. यामुळे सकाळच्या विमान निर्गमनांवर परिणाम झाला.
काही स्पाईसजेट सिस्टीमला काल रात्री रॅन्समवेअर हल्ल्याचा सामना करावा लागला. ज्यामुळे आज सकाळळी विमाना सेवेवर याचा परिणाम झाला. IT टीमने परिस्थिती नियंत्रित करून सुधारली असून आता उड्डाणे सामान्यपणे सुरु आहेत, असे स्पाईसजेटकडून सांगण्यात आले आहे.
स्पाईसजेटवर रॅन्समवेअर हल्ल्याचा प्रयत्न झाला. काही विलंबानंतर विमान उड्डाणे पूर्ववर सुरु झाली आहेत. स्पाईसजेट विमान कंपनीने आज सकाळी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, या हल्ल्यामुळे त्यांचे कामकाज थांबले होते आणि सकाळी उड्डाणाच्या सुटण्यावर परिणाम झाला.