मुंबई राजमुद्रा दर्पण | मुंबईमधील भाजपचे पदाधिकारी, चंद्रपूर महानगर पालिकेतील नगरसेवक यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापनदिन 19 तारखेला दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे सांगितले आहे.
विकास कामांसाठी प्रत्येक राज्याला निधी आवश्यक असतो. त्या त्या राज्यांच्या निधीवर टॅक्स आधारित असतो. केंद्र सरकार वेगवेगळे टॅक्स लावतात त्यात एका टॅक्समध्ये आपल्याला हिस्सा मिळतो. जी रक्कम आम्ही कमी केली त्याचा राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे. तरीही भाजपचे नेते बोलताय अजून कपात करायला हवी.
राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली होती. राज्य सरकारला जे काही शक्य होते ते केले आहे. यंदा राज्याने कुठलाही नवीन टॅक्स न वाढवता अर्थसंकल्प सादर केला.
केंद्राने आता साधारण पेट्रोल 8 रुपये आणि डिझेलची 2 रुपयाने कपात केली. पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतींमध्ये केंद्र सरकार टॅक्स लावतो आणि राज्य सरकार व्हॅट लावतो.
मी अर्थमंत्री आहे त्यामुळे राज्य सरकारकडून जेवढी शक्य आहे तेवढी कपात आम्ही केलेली आहे. आम्ही केंद्र सरकार सारखे नसून, आधी मोठ्या प्रमाणावर किमती वाढवायच्या आणि नंतर अर्ध्या कमी करायच्या. तसलं आम्हाला जमत नाही अशा शब्दात टोला अजित पवार यांनी केंद्र सरकारला लगावला.