जळगांव राजमुद्रा दर्पण | आंतरराष्ट्रीय जैवविविधता सप्ताह रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सप्ताहात महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण, जलदौड रॅली, पोस्टर सादरीकरन स्पर्धा, जैवविविधतेचे संवर्धन या सहित विविध कार्यक्रम घेण्यात आले.
प्रत्येक वर्षी 22 मे रोजी जैवविविधतेच्या समस्यांबद्दल जागरूकता आणि संकल्पना समजून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेचा दिवस साजरा केला जातो.संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या दिवसाचे उद्दिष्ट जगभरातील लोकांना जैविक विविधतेचे महत्त्व आणि त्याचा पृथ्वीच्या परिसंस्थांवर कसा परिणाम होतो याची आठवण करून देणे हा आहे. या सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, जैवविविधतेने समृद्ध, शाश्वत आणि आर्थिक क्रियाकलापांसाठी संधी देणारे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे.
पृथ्वीवर आपले जीवन ही निसर्गाची एक अनोखी देणगी आहे. त्यामुळे निसर्गाच्या देणग्या, झाडे, वनस्पती, अनेक प्रकारचे प्राणी, माती, हवा, पाणी, महासागर, नद्या यांचे आपण संरक्षण केले पाहिजे असे त्यांनी यावेळी नमूद केले तसेच यावेळी काही उपस्थित विध्यार्थ्यांनी जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्व सांगत प्रतिज्ञा घेतली. जैवविविधतेच्या असमतोलामुळे पूर, दुष्काळ, वादळ अशा विविध नैसर्गिक आपत्तीचे संकट वाढतच चालले आहे. त्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.