मुंबई राजमुद्रा दर्पण | कोरोना संसर्गानंतर आता ‘मंकीपॉक्स’च्या संसर्गाने मान उंचावली आहे. मंकीपॉक्स’ जोरदार पसरत असून हा आता चिंतेचा विषय बनलाय. आतापर्यंत किमान 19 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद झाली आहे.
दरम्यान यानंतर आता मंकीपॉक्सबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज पसरू लागलेत. मात्र लोकांनी अफवांवर लक्ष देऊ नये, असे तज्ञांचा संदेश आहे.
या संसर्गाचा नाव मंकीपॉक्स आहे पण याचा अर्थ हा व्हायरस केवळ फक्त माकडांपासून पसरतो असे नाही. मंकीपॉक्स संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याशी संबंध साधल्यास किंवा संपर्कात आल्यास होतो. हा संसर्ग कोणत्याही प्राण्याला होऊ शकतो.
हा व्हायरस संक्रमित प्राण्यांच्या सेवनाने पसरू शकतो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, केवळ मांस खाल्ल्याने मंकीपॉक्सची लागण होत नाही. सोशल मीडियावर मंकीपॉक्सबाबत अनेक पोस्ट केल्या गेल्यात. मात्र तज्ज्ञांनी याला एक गैरसमज म्हटलं आहे. परंतु निरोगी, चांगले शिजवलेले मांस खाल्ल्याने हा रोग पसरत नाही. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार काळजी घेणे हे गरजेचा आहे परंतु हा व्हायरस कोरडा सारखा पसरू शकत नाही. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ एन के अरोरा यांनी सांगितलं की, ‘मंकीपॉक्स हा कोविडसारखा संसर्गजन्य किंवा गंभीर नाही. मात्र, या व्हायरसचा प्रसार हा चिंतेचा विषय असून भारतात आतापर्यंत मंकी बॉक्सचा एकही रुग्ण सापडलेला नाही.