मुंबई राजमुद्रा दर्पण | राम जन्मभूमी नंतर आता हनुमान जन्मभूमी वरून त्र्यंबकेश्वर मध्ये वाद होताना दिसून येत आहे. हनुमानाची जन्मभूमी ही किष्किंधा असल्याचा दावा गोविंदानंद सरस्वती महाराजांनी केला. त्रंबकेश्वर मधील अंजनी ही तपोभूमी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
त्रंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी हनुमानाचे जन्मस्थान किष्किंदा आहे की अंजनेरी यासंदर्भात विद्वानांनी लेखी पुरावे मांडावे असे आव्हान केले आहे. नाशिकमधील महंतांची हनुमान जन्मस्थळावरून मतमतांतरं झाल्याने आता नवीन वाद डोकं वरती काढणार असे चित्र दिसत आहे.
हनुमानाचे जन्मस्थान देशात कुठे आहे, यावरून देशाच्या उत्तरेकडे सध्या मोठा वाद पेटला आहे. देशातून तब्बल 9 ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थानाचा दावा केला जातो. त्याचेच पडसाद नाशिकमध्ये उमटत आहेत. जिथं एका चर्चेचं आयोजन त्र्यंबकेश्वरमध्ये करण्यात आलं होतं. जिथं किष्किंधाचे गोविंदाचार्यही इथं आले होते. शिवाय काही अभ्यासकांनीही इथं हजेरी लावली. अंजनेरी नगरी इथं केवळ तपोभूमी असून हनुमान तिथे लहानपणी खेळल्याचे संदर्भ मिळाले, याच शास्त्रोक्त चर्चेमुळे नव्या वादाला तोंड फुटत आहे. तिथेच काही जुने संदर्भही सादर करण्यात आले. वाल्मिकी रामायणाचे संबंध ह्या ठिकाणी देण्यात आली असून, आणि अंजनेरी येथे हनुमानाची जन्मभूमी असल्याचं यातून स्पष्ट झालं. तर, किष्किंधा हीच हनुमानाची जन्मभूमी असल्याचं समोर आलं.