मुंबई राजमुद्रा दर्पण | कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. राज्याचा आठवड्याचा पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 1.59 टक्के असला तरी मुंबईमध्ये हा दर 3.16, तर पुणे येथे 2.16 टक्के आहे असे आरोग्य विभागाने दर्शवले आहे.
पुण्यामध्ये याच कालावधीत 297 वरून नवीन रुग्णसंख्या 329 इतकी झाली असून, मुंबईमध्ये नवीन रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ.झाली आहे पुणे येथे -9.73 टक्क्यांची घट दिसून येते. ठाण्यातही रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. ठाणे, रायगड, मुंबई, पालघर यांचा एकत्रित विचार केला असता 35.86 टक्क्यांची रुग्णवाढ दिसून येते. इतर जिल्ह्यांमध्ये ही वाढ 3.96 टक्के इतकी आहे.
मुंबई-पुण्यात दैनंदिन रुग्णसंख्या वाढली
मुंबईमध्ये 12 ते 18 मे या कालावधीत 1,002 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 19 ते २५ मे या कालावधीत 1,531 नवीन रुग्ण मुंबईमध्ये आढळून आले आहेत.
यामुळे नागरिकांनी काळजी घेतली नाही तर निर्बंध लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.