जळगांव राजमुद्रा दर्पण | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा आपल्या जळगाव शहरात दिमाखात उभा आहे. त्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत परंतु अगोदर काही अंशी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल माहिती करून घेऊयात. देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्यासाठी आपले सर्व आयुष्य वाहून देणाऱ्या विज्ञाननिष्ठ, प्रखर हिंदुत्ववादी, कवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज जन्मदिवस.
सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी आपले पूर्ण आयुष्य लावले. त्यासाठी त्यांना अंदमान मधल्या सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगली. मात्र मातृभूमी स्वातंत्र्यासाठी त्यांनी हे गाव आनंदाने स्वतःच्या शरीरावर सोसले. त्यांच्यावर झालेले अत्याचार हे संपूर्ण देशाला माहीत आहेत. यासाठीच त्यांना नागरिकांनी ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी दिली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा दैदिप्यमान पुतळा आपल्या जळगाव शहरात दिमाखात उभा आहे.
या पुतळ्याचा नेमका इतिहास आता आपण जाऊन घेऊया. 1985 साली तत्कालीन नगरपालिकेने जळगाव शहरामध्ये विविध पुतळे बांधण्यासाठी विशेष पुतळा समिती तयार करण्यात आली होती. नगर पालिकेच्या बांधकाम विभागा अंतर्गत ही समिती निश्चित करण्यात आली होती. त्यावेळची नगरसेवक बन्सीलाल ओझा यांच्या विनंतीमुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पुतळा आज आपल्याला पाहायला मिळतो आहे.