जळगाव, राजमुद्रा दर्पण |राजकारणात कार्यकर्त्या पासून ते नेत्यांपर्यंत संवाद साधने हे सर्वात जास्त महत्वाचे असते. संवादाची राजकारणात मोठी ताकद आहे.
शिवसंपर्क अभियानातून शिवसेना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा पोहोचत असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. ते तालुक्यातील भोकर येथे शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत पार पडलेल्या मेळाव्यात बोलत होते. जळगाव तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण पूर्ण ताकदिनीशी उतरणार असून यात शिवसेनेचे भगवा डौलाने फडकणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर यासाठी शिवसैनिकांनी सुध्दा सज्ज राहण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.*
तालुक्यातील भोकर येथे आज शिवसंपर्क अभियानातील टप्प क्रमांक-२ च्या अंतर्गत पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, उपनेते लक्ष्मणराव वडले, प्रशांत पाचपुते, संतोष चांदे, संकेत बने, शांताराम बने, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा संघटक नानाभाऊ सोनवणे, पंचायत समिती सभापतींचे पती जनाआप्पा कोळी, माजी सभापती नंदू पाटील, संगायो सभापती रमेशआप्पा पाटील, शिवराज पाटील, रोजगार हमीचे रवी कापडणे, , शिवराज पाटील, सुनील बडगुजर,बालाशेठ लाठी , प्रमोद सोनवणे, मुरलीधर पाटील, रामचंद्र बापू पाटील, विराज कावडिया, डॉ. कमलाकर पाटील, भरत बोरसे, राजेंद्र पाटील, गोपाल जिभाऊ, रवींद्र चव्हाण, संजय पाटील सर, सरपंच पती हरेश पाटील आदींसह परिसरातील २७ सरपंच शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आधी सुरेशदादा जैन तर आता तीन पंचवार्षिकमध्ये आपण येथे प्रतिनिधीत्व करत आहे. आपण या परिसरातील विकासकामांना वेग आलेला आहे. या भागात शिवसेना खोलपर्यंत रोवली गेली आहे. तसेच या भागातील जनतेच्या सेवेसाठी शिवसैनिकांनी नेहमी सुसज्ज असतात. मध्यंतरी आलेल्या कोविडच्या आपत्तीत लोकांच्या मदतीला शिवसेनाच धावून गेली होती याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. तर, आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच कार्यकर्त्यांच्या निवडणुका येत असून यात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.