मुंबई राजमुद्रा दर्पण | फळभाज्या पालेभाज्या या आपल्या जीवनातील गरजेच्या गोष्टी आहे. रोजच्या वापरात आपण त्या समाविष्ट केल्या आहे. आता त्यावरही महागाईचे संकट अवतरले आहे.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल डिझेलच्या daraetki टोमॅटोची किंमत झाली आहे. दुसरीकडे पालेभाज्याही कडाडल्या आहेत. बाजारात मेथी, कांदापात, पालक, शेपू, कोथिंबीर या भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. टोमॅटोचे भाव किलोमागे 80 ते 100 रुपयांच्या घरात गेलेत. पेट्रोल डिझेलप्रमाणे टोमॅटोही महागला आहे. त्यामुळे तुमच्या रोजच्या जेवणातला टोमॅटो हद्दपार होण्याची भीती आहे. कांद्याचे दर मात्र घसरले आहेत. कांदा 15 ते 20 रूपये किलोने विकला जात आहे. मेथीची जुडी 40 रुपयांना मिळत आहे. तर कोथिंबीरची जुडी 50 ते 60 रुपयांना मिळत आहे.