जळगाव राजमुद्रा दर्पण | राज्यसभा निवडणुकीवरून झारखंडमधील सत्ताधारी आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यातील संघर्ष संपलेला नाही. अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षांचे नेते राज्यसभा निवडणुकीसाठी आपापल्या पक्षांचे उमेदवार देण्याचा दावा करत आहे. यादरम्यान, सूत्रांनुसार JMM ने ही सीट काँग्रेसला देण्याचे ठरवल्याचे वृत्त आले आहे. पण दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या वक्तव्याने हे प्रकरण सध्या मिटलेले दिसत नाही.
रांचीमध्ये JMM विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर हेमंत सोरेन दिल्लीला गेले होते, त्यानंतर राज्यसभा निवडणुकीवर त्यांनी सोनिया गांधींशी चर्चा केली. या भेटीनंतर हेमंत सोरेन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांनी सोनिया गांधींशी सुमारे पाऊण तास चर्चा केली. हेमंत सोरेन यांनी दावा केला की दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली आणि झारखंडमधील एकमेव राज्यसभेच्या जागेसाठी युतीकडून एकच उमेदवार असेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
हेमंत सोरेन म्हणाले की, झारखंडमध्ये गेल्यानंतरच उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. प्रसारमाध्यमांकडून वारंवार चौकशी करूनही त्यांनी उमेदवार JMM किंवा काँग्रेसचा असेल हे स्पष्ट केले नाही. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चामध्ये काहीही फरक नाही. दोन्ही पक्ष मिळून भारतीय जनता पक्षाला उत्तर देण्यास तयार होतील.
यापूर्वी रांचीमध्ये JMM विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षाकडूनच राज्यसभेचा उमेदवार उभा करण्याचे सांगण्यात आले होते. सोनिया गांधी यांच्या भेटीत त्यांची चर्चा झाली नसल्याची शक्यता वर्तवली जात होती. कदाचित त्यामुळेच हेमंत सोरेन यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही.
आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत मुख्यमंत्री हेमंत म्हणाले की, “झारखंडमध्ये भारतीय जनता पक्ष कमकुवत झाला आहे. त्यामुळे सरकारविरोधात मोहीम चाललेली आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे, पण झारखंडमध्ये तसं नाही आहे,असा दावा त्यांनी केला. हा त्रास भाजपच्या नेत्यांना सहन होत नाही आहे”