जळगाव राजमुद्रा दर्पण | नगरसेवक शहराच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महासभेत अनुपस्थित राहिले आहे. शहर समस्यांनी होरपळत असताना नगरसेवकांनी मात्र महासभेकडे पाठ फिरवली आहे. कोणी वैद्यकीय कारण तर अनेकांनी खाजगी अडचणी दाखवत महापालिकेच्या महासभेत दांडी मारली आहे.
प्रत्येक महासभेचे आयोजन महिन्याच्या 20 तारखेच्या आत होणे अत्यावश्यक असल्याचा नियम आहे. महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर असतात महापौर च महासभा आयोजित करण्याचे आदेश देतात मात्र 30 मी रोजी आयोजित करण्यात आलेली महासभा ही उशिराने महापौरांनी आयोजित केली असल्याचा आरोप मनपातील काही बंडखोर नगरसेवकांनी केला आहे. 20 तारखेच्या आत महासभा बोलवण्यात यावी असा नियम असताना मात्र कायद्याची अमलबजावणी होत नसल्याचा आरोपाची कुजबुज मनपाच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पाणी,आरोग्य,रस्ते या तीन महत्वपूर्ण असलेल्या मूलभूत गरजा महापालिका नागरिकांना पुरवण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. यातच आगामी काळ निवडणुकांचा आहे.सात ते आठ महिन्या नंतर महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. निवडणुकांमध्ये मते मागण्यासाठी जाताना नगसेवकांना प्रभागात कामे झाली नसल्याने अडचणीचे ठरणार आहे.
शहरात समस्या च्या केंद्रस्थानी आहे. जळगावात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रस्ते आणि पाण्याचा आहे. या समस्येकडे नगरसेवकांनी पाठ फिवरली आहे. यामुळे महापालिका प्रशासनाकडे समस्यांचा तक्रारीचा पाऊस पडत आहे.
विकासकामांना दाद मागण्यासाठी महासभेचे आयोजन करण्यात येते मात्र त्याच सार्वभौम असलेल्या महासभेला नगरसेवकच अनुपस्थित राहत असल्याने विकासकामे होणार कशी ? हा सुद्धा एक सवालच आहे. या सगळ्या कारनाम्याचा हिशोब आगामी निवडणुकीत जळगावकर नागरिक मागतील हे निश्चित आहे.