जळगाव राजमुद्रा दर्पण | जळगाव शहरात सातत्याने होणारा पाणीपुरवठा हा दूषित होत असल्याने शहरातील जुने जळगाव परिसरातील नागरिकांनी महापालिकेची महासभा असताना प्रचंड आक्रोश करीत आंदोलन केले आहे. नळ पट्टी न भरल्यास महापालिका थेट नळ कनेक्शन कापते असे असताना नागरिक कर भरतात मात्र गेल्या महिन्याभरापासून पाणी दूषित येत असल्याने त्याकडे महापालिका दुर्लक्षित करीत असल्याचा आरोप आंदोलक महिला व नागरिकांनी केला आहे. आमच्या समस्या तात्काळ सोडवण्यात यावा अन्यथा अधिक आक्रमक आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा पिडीत नागरिकांनी दिला आहे. यावेळी पुरावा म्हणून आंदोलक महिलांनी थेट दूषित पाण्याच्या बोटल आंदोलनात आणल्या होत्या.
दूषित पाण्यावर मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहे. मात्र महापालिकेचे ढिम्म प्रशासन व निवडून दिलेले लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नगरसेवक निवडून आल्यापासून तोंड देखील दाखवायला तयार नसल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
खड्ड्याची समस्या असताना आता थेट गढूळ पाणी येत असल्याने लहान बालके आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे महापालिकेला कर भरणाऱ्या नागरिकांना आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे. जळगाव शहरात महापालिकेच्या अनास्थेमुळे व लोकप्रतिनिधी च्या दुर्लक्षा मुळे आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संतापजनक परिस्थिती नागरिकांमध्ये आहे.