जळगांव राजमुद्रा दर्पण|शहरातील क्वेश्चन मार्क ब्रॅण्ड प्रस्तुत मिस्टर अँड मिसेस त्यासोबतच किड्स फॅशन शो स्पर्धा संपन्न झाली. मॉम्स गटात जळगावच्या हर्षाली तिवारी यांनी बाजी मारली असून त्यांना प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.देशभरातील तज्ज्ञ आणि प्रसिद्ध मॉडेल्सने स्पर्धेचे परीक्षण केले.
मॉम्स गटात सहभागी सर्व स्पर्धकांमध्ये जळगावच्या हर्षाली तिवारी यांनी उत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांक पटकावला. हर्षाली तिवारी यांना प्रमुख पाहुणे गोपाल दर्जी, पवन टाक, सुशांत भावसार तसेच परीक्षक मॉडेल्स शुभम जैन, दीपिका उपरेती, प्रीती उपरेती, मृण्मयी अकोलेकर, आयोजक क्वेश्चन मार्क ग्रुपचे सिद्धार्थ अहिरे, जयश्री अहिरे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे सन्मान चिन्ह व स्मार्ट मॉम्सचा ‘किताब, देऊन सन्मानित करण्यात आले. हर्षाली तिवारी यांनी सुंदरता आणि बुद्धीची सांगड घालत सादरीकरण केल्याने त्यांचे विजयाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.क्वेश्चन मार्क ब्रॅण्ड प्रस्तुत मिस्टर अँड मिसेस फॅशन शो नुकतेच जळगावात पार पडला. जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता आणि विविध गटात हि स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुबंईचे शुभम जैन, उत्तराखंडचे दीपिका उपरेती, प्रीती उपरेती, नाशिकच्या मृण्मयी अकोलेकर या प्रसिद्ध मॉडेल्सने काम पाहिले. कोरोना काळानंतर क्वेश्चन मार्क ग्रुपतर्फे जळगावात पहिल्यांदा होत असलेल्या स्पर्धेला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.