कुणीतरी म्हटलंय की, ‘टॅलेंटला कमीपणाने दडपता येत नाही..’ महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एका दुकानदाराच्या मुलाने हे खरे करून दाखवले आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या रामेश्वर सुधाकर सब्बनवाड यांनी UPSC परीक्षा पास केली आहे .
महाराष्ट्रातील एका गावातील दुकानदाराच्या मुलाने नागरी सेवा परीक्षा(सिव्हिल सेववा परीक्षा) 2021 उत्तीर्ण केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सोमवारी जाहीर केलेल्या निकालात लातूरच्या उदगीर तालुक्यातील हुंडरगुळी गावातील रामेश्वर सुधाकर सब्बनवाड याने UPSC मध्ये 202 वा क्रमांक पटकावला आहे. त्यांचे शालेय शिक्षण लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातून झाले आणि पुण्यातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. सब्बनवाडच्या म्हणण्यानुसार, त्याने दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली आहे. सब्बनवाडचे वडील दुकानदार असून आई गृहिणी आहे. UPSC नुसार, एकूण 685 उमेदवार – 508 पुरुष आणि 177 महिला – पात्र ठरले आहेत आणि विविध केंद्रीय सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने त्यांची शिफारस केली आहे.
यापूर्वी आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल 17 मार्च रोजी जाहीर केला होता. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती 5 एप्रिल ते 26 मे 2022 या कालावधीत घेण्यात आल्या. UPSC नागरी सेवा परीक्षा 2021 च्या भरतीद्वारे, IAS, IFS, IPS आणि गट A आणि गट B च्या 749 पदे भरली जातील.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS), रेल्वे गट A (भारतीय रेल्वे खाते सेवा), भारतीय पोस्टल सेवा, भारतीय पोस्टल सेवा, भारतीय व्यापार सेवा आणि इतर सेवा UPSC द्वारे निवडले जातात.