मुंबई राजमुद्रा दर्पण | योगी सरकारने मोठा निर्णय घेतला असून यामध्ये दोन शहरांमध्ये मद्यपान आणि मांसवर बंदी घालण्याचा आदेश करण्यात आला आहे. या आदेशावर अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही शहरातील मद्यपान आणि मांसाची दुकाने बंद करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ही दोन्ही अध्यात्मिक शहरे आहेत. त्यामुळे या ठिकाणी अशा मद्यपान आणि मांस हे दुकाने चालवायला परवानगी दिली जाणार नाही.
योगी सरकारच्या आदेशानुसार, मथुरा महानगरपालिकेच्या 22 प्रभागांमध्ये मथुरेच्या श्री कृष्णाच्या जन्मस्थानाच्या आजूबाजूच्या 10 किमीच्या परिसरात दारूच्या दुकानांवर बंदी घालण्यात आलीये. हा आदेश समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून 10 किलोमीटरच्या परिसरात येणाऱ्या 37 दुकानांवर दारू, बिअर आणि ड्रग्ज विक्री पूर्णपणे बंद केलीये.
जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी प्रभात चंद यांनी सांगितलं की, श्रीकृष्ण जन्मस्थानच्या 10 चौरस किलोमीटर परिसरात आता एकंही दारू आणि मांसचं दुकान सुरू नाही. बंद करण्यात आलेल्या दुकानांमध्ये बार परवानाधारक हॉटेल, दारू, बिअर अशा दुकानांचा समावेश आहे.राज्य सरकारनेही मथुरा महानगरपालिकेच्या 22 वॉर्डमध्ये येणारी सर्व 37 दुकानं बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.