पुणे राजमुद्रा दर्पण | स्वतःची वास्तू असावी अशी इच्छा बाळगणाऱ्या साठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पुणे विभागात म्हाडा कडून लॉटरी काढण्यात येणार आहे. पुणे विभागातील नागरिकांसाठी 4 हजार 744 घरांची लॉटरी असणार आहे.
येणाऱ्या काही दिवसात या साठी जाहिरात प्रसिद्ध होणार असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या मुदतीत अर्ज भरता येईल. पुण्यासह पिंपरी चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा सोडतीमध्ये समावेश आहे. अत्यल्प, अल्प गटांसाठी ही घरे उपलब्ध करण्यात आलेली आहे. दरम्यान, मुंबईत दिवाळीमध्ये म्हाडा तीन हजार घरांची सोडत काढणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पहाडी गोरेगाव, मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली.
गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्यावतीने (म्हाडा) पुणे विभागातील नागरिकांसाठी घरांची सोडत काढण्यात येणार असल्याने यावर नागरिकांच्या उड्या पडण्याची शक्यता आहे. ‘गेल्या काही वर्षातील पुणे विभागाच्या म्हाडाची ही दहावी सोडत ठरली आहे.