मुंबई राजमुद्रा दर्पण | पावसाची निगडित आनंदाची बातमी. मान्सून महाराष्ट्रा पर्यंत पोहोचला आहे.तरीही जून महिन्यात पाऊसाचा अंदाज कमी आहे.
सध्या वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे असे संकेत येत आहेत परंतु ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हवामान विभागाने यंदा महाराष्ट्रात सरासरी 101 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. जून महिन्यात वाऱ्याचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील.
काही काळ पावसात खंड पडणार आणि कमी दिवसात जास्त पाऊस पडणार असे दोघही संकेत हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेले आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजेच 10 जूनपासून पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर पाऊस वाढणार आहे.