जळगांव राजमुद्रा दर्पण | जिल्हा प्रशासनाने येणाऱ्या निवडून पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या गणांची नवीन रचना समोर आणली आहे.
जिल्हा परिषद व त्यामध्ये येणार्या पंचायत समिती निवडणुक २०२२ अंतर्गत ७७ गट व १५४ गण यांचे प्रारूप प्रभाग रचनेबाबतची अधिसुचना जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय , सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसिल कार्यालय व तसेच सर्व गटविकास अधिकारी यांचे कार्यालयात सादर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमध्ये आधी १३४ गण होते. मात्र वाढीव रचनेनुसार यात २० गणांची भर पडली असून एकूण गण संख्या ही १५४ इतकी झालेली आहे. प्रभाग रचने संदर्भात ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी यांच्या कडे दिनांक 8 जुने किंवा तत्पुर्वी लेखी सादर कराव्यात उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी विचारात घेणार नाही. सदर हरकती वरील सुनावणी विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे दिनांक 10 जून रोजी होणार आहे.