(राजमुद्रा वृत्तसेवा) महाराष्ट्रातील कलावंतांच्या न्याय आणि हक्काची लढाई लढण्यासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या प्रदेश महासचिव पदी ज्येष्ठ लोकशाहीर गणेश अमृतकर यांची निवड करण्यात आलेली आहे. या राज्यव्यापी संघटनेच्या महत्त्वाच्या प्रदेश महासचिव पदावर अमृतकर यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गायक सोमनाथ गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष मास्टर सुजित औताने, प्रदेश उपाध्यक्ष कवयित्री रेखा बागुल आणि महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व कलावंतांकडून यावेळी अमृतकर यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्रातील लॉकडाऊन शिथिल होताच लोकशाहीर गणेश अमृतकर यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मानपूर्वक पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.