सातारा राजमुद्रा दर्पण | सध्याची सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री पुढचा राष्ट्रवादीचाच, असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे म्हटले आहे. साताऱ्यात झालेल्या सभेमध्ये मुंडे बोलत होते.
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यावर आता धनंजय मुंडे यांनी विधान केल्याने राजकीय वातावरणात हा चर्चेचा विषय झाला आहे.
राज्यात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असे विधान सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ते साताऱ्यातील डिस्कळ इथल्या एका सभेत बोलत होते. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आले आहेत. विविध विकासकामांच्या उदघाटनाबरोबर त्यांची खटाव तालुक्यातील डिस्कळ इथं झालेला शेतकरी मेळावा हा चांगलाच गाजला. यावेळी धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्ष टीका केली. यावेळी त्यांनी पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री पदाचे खाते हे आपल्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असल्याचंही त्यांनी सांगितले.
अगोदर सुप्रिया सुळे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे! असे वक्तव्य केले होते. धनंजय मुंडे म्हणतात, पुढचा मुख्यमंत्री आमचाच असणार. यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हटले की, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तीन पक्ष जरी एकत्र असेल तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मोकळीक आहे.