जळगांव राजमुद्रा दर्पण | जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी चाकरमान्यांचे भुसावळ मुंबई पॅसेंजर आणि भुसावळ नाशिक देवळाली शटल सुरू नसल्यामुळे त्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे.
याबाबत केंद्र शासनाला पत्र दिले आहेत लवकरच या दोन्ही गाड्या सुरू होणार मात्र त्याची तारीख सांगू शकणार नाही अशी माहिती पत्रकार परिषदेत खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे. पक्षाला केंद्रामध्ये येऊन आठ वर्षे पूर्ण झाली आहे. गत आठ वर्षात केंद्र सरकारने कष्यापाढतीने संपूर्ण देशाचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला. याची माहिती देण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये आजपर्यंत कोण कोणत्या योजना राबवल्या याची माहिती दिली. ज्या मध्ये जनधन योजना उज्वला योजना अशा विविध योजनांचा समावेश होता याच बरोबर केंद्र सरकारने ज्या प्रकारे 370 कलम हटवला त्याबाबतची देखील त्यांनी माहिती दिली आहे.