पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने अनिवार्य eKYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत आतापर्यंत ३१ जुलै २०२२ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी त्याची अंतिम मुदत ३१ मे २०२२ होती. पीएम किसान वेबसाइटवरील फ्लॅशनुसार, “सर्व PMKISAN लाभार्थ्यांसाठी eKYC ची अंतिम मुदत ३१ जुलै २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.”
३१ मे २०२२ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे १० कोटींहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) अंतर्गत आर्थिक लाभांचा ११ वा हप्ता जारी केला होता. पीएम-किसान योजनेअंतर्गत, प्रत्येक जमीनधारक शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष ६००० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
eKYC कसे करावे ? :-
१) यासाठी, प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल फोन ब्राउझरच्या क्रोम सारख्या आयकॉनवर टॅप करा आणि तेथे pmkisan.gov.in टाइप करा. आता तुम्हाला पीएम किसान पोर्टलचे मुख्यपृष्ठ मिळेल, त्याच्या खाली जा आणि तुम्हाला ई-केवायसी लिहिलेले दिसेल. त्यावर क्लीक करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर टॅप करा.
२) आता त्यात आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP येईल.तो तेथे प्रदान केलेल्या बॉक्समध्ये ते टाइप करा.
३) यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी बटण टॅप करण्यास सांगितले जाईल. त्यावर टॅप करा आणि आता तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आणखी 6 अंकी OTP येईल. ते भरा आणि सबमिट वर टॅप करा
जर सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल नाहीतर Invalid लिहून येईल. जर तुमचे eKYC आधीच पूर्ण झाले असेल तर “eKYC आधीच पूर्ण झाले आहे” असा संदेश दिसेल. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशात आणखी 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.