जळगाव राजमुद्रा दर्पण | जळगाव जिल्हावासियांच्या विकासरुपी अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेत प्रशासनाच्या साथीने समाजकारणातून विकासरथ हाकणार्या राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री.गुलाबरावजी पाटील साहेब ऊर्फ भाऊंचा आज, रविवार दि.5 जून 2022 रोजी वाढदिवस. विकासासाठी दृढ़ संकल्प घेऊन सदैव कार्यरत असलेले आदरणीय गुलाबभाऊ म्हणजे एकनिष्ठ व्यक्तिमत्त्व, साहसी, प्रखर वक्ता, खानदेशाचा बुलंद आवाज… आदरणीय मंत्रीमहोदयांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तसेच त्यांच्याप्रति शुभचिंतन व्यक्त करण्यासाठी जिल्ह्याभरातील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व नागरिक उत्स्फूर्तपणे आज त्यांना भेटत आहेत.
या अनुषंगानेच आज, दि. 5 जून 2022 रोजी सकाळी शिवसेना संपर्क प्रमुख श्री.संजयजी सावंत यांच्यासह जळगाव शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्रीताई सुनिल महाजन यांच्या हस्ते आदरणीय मंत्रीमहोदयांना वाढदिवसानिमित्त ‘विजयी गदा’ सस्नेह भेट देऊन त्यांना निरामय आरोग्यासह उदंड आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. ही ‘विजयी गदा’ म्हणजे शिवसेनेची विजयी पताका सदैव माननीय भाऊंच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात फिरत राहो याच हेतूने शुभचिंतन व्यक्त करीत त्यांना प्रदान करण्यात आली. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख श्री.गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख श्री.शरद तायडे, विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन, शिवसेनेचे जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.शाम कोगटा, श्री.खुबचंद साहित्या आदी नेते, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.