मुंबई राजमुद्रा दर्पण । नवी मुंबईत शनिवारी पहाटे आठ मजली निवासी इमारतीचे छत कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले आहे. त्वरित अग्निशमन बोलावण्यात आले आहे ,त्यावेळी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
नेरुळच्या सेक्टर १७ मधील इमारतीच्या सहाव्या मजल्यापासून तळमजल्यापर्यंतची छत सकाळी १२.५० वाजता कोसळली, असे अधिकाऱ्याने सांगितले. सुरुवातीला सहाव्या मजल्यावरील फ्लॅटचे छत कोसळले, त्यानंतर खाली असलेल्या सर्व मजल्यांची छत एकामागून एक खाली कोसळत गेली.
अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले त्यांनी सांगितले की स्थानिक अग्निशमन दल आणि पोलीस बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर ढिगाऱ्यातून वाचवण्यात आलेल्या वेंटेकेश नाडा यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर सात जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाव्या मजल्यावर पाडण्याचे काम सुरू होते, त्यामुळे सहाव्या मजल्यावरचे छत पाचव्या मजल्याच्या छताला धडकले. यानंतर तळमजल्यापर्यंतच्या सर्व मजल्यांचे छत एका पाठोपाठ एकमेकांवर कोसळले. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने गेल्या महिन्यात नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे.