भारतीय रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. (Northe ast Frontier Railway) ईशान्य फ्रंटियर रेल्वेने अप्रेंटिसच्या पदांसाठी बंपर भरती जारी खुली झाली आहे .ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार NFI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे अर्ज भरू शकतात. ही परीक्षेशिवाय रेल्वेत नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. शिकाऊ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत, नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार NFR च्या अधिकृत साइट nfr.indianrailways.gov.in यावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
1 जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून ती 30 जून 2022 ही अर्ज दाखल शेवटची तारीख असेल , या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 5636 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
रिक्त पद :-
कटिहार (KIR) आणि TDH कार्यशाळा – 919
अलीपुरद्वार (एपीडीजे) – 522
रंगिया (आरएनव्ही) – 551
लुमडिंग (MLG), S&T / कार्यशाळा / MLG (PNO) आणि ट्रॅक मशीन / MLG-1140
तिनसुकिया (TSK)- 547
नवीन बोंगाईगाव कार्यशाळा (NBQS) आणि EWS/BNGN-1110
दिब्रुगड कार्यशाळा (DBWS) – 847
शैक्षणिक पात्रता :-
उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10 वी किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच आयटीआय असणे आवश्यक आहे.
वय श्रेणी :-
उमेदवारांची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी.
निवड :-
उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. ज्या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप करायची आहे त्या ट्रेडमधील मॅट्रिक + आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे प्रत्येक युनिटमधील गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
परीक्षा शुल्क :-
या पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांचे अर्ज शुल्क 100 रुपये आहे.