धुळे राजमुद्रा दर्पण |अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे जिल्ह्याच्या वतीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना भेटावी त्यांच्यातील कलात्मक गुणांना वाव मिळावा व ग्रामीण संस्कृती ग्रामीण जीवन पद्धती जवळून अनुभवता यावी याकरता दि.28 मे ते 30 मे दरम्यान तीन दिवशीय उन्हाळी अनुभूती शिबिराचे आयोजन लामकानी याठिकाणी करण्यात आले होते. शिबिरा करता धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
आजचा विद्यार्थी आजचा नागरिक ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी विकासासाठी मागील 75 वर्षांपासून सातत्यपूर्ण काम करणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सगळ्यात मोठी संघटना आहे मागच्या अनेक वर्षापासून विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अशा शिबिरांचे आयोजन केल्या जाते.
या अनुभूती शिबिराच्या उद्घाटनासाठी लामकानी गटातील पंचायत समिती सदस्य प्रा. तुषार महाले उपसरपंच बाजीराव महाले अभाविप धुळे जिल्हा प्रमुख श्री अमोल मराठे प्रदेश सहमंत्री भावेश भदाणे शिबीर प्रमुख यश मराठे उपस्थितीत होते.
तीन दिवशीय शिबिरामध्ये वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन करण्यात आले होते त्यात श्रमदान, करियर गायडन्स, ग्रामविकासाचे देशाच्या प्रगतीतील योगदान, शारीरिक स्वास्थ आजची गरज, स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन, मॅनेजमेंट गेम, संस्कृतिक कार्यक्रम, वाद_विवाद, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. वरील सत्रांची मांडणी करण्याकरता नामवंत प्राध्यापक लेखक मंडळींना बोलवण्यात आले होते.
शिबिराच्या समारोप प्रसंगी अभाविप जळगाव विभाग संघटनमंत्री मारुती कल्याणकर, धुळे शहराध्यक्ष प्रा. डॉ.हेमंत जोशी, शिंदखेडा शहर अध्यक्ष प्रा. उमेश चौधरी मंचावर उपस्थित होते या सत्रात विद्यार्थ्यांनी तीन दिवसात त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव सांगितले शिबिराचा नियंत्रक म्हणून योगेश कोळवदे यांनी काम पाहिले….