जळगाव राजमुद्रा दर्पण | विधान परिषदेची निवडणूक अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले एकनाथ राव खडसे हे देखील व्यक्तिगत मतांची जुळवा-जुळव करण्यासाठी कामाला लागले आहे. त्यांनी नुकतीच बविआ चे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती समोर आली आहे. बविआ कडे तीन आमदार असून विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी बविआचे संख्याबळ महत्वपूर्ण मानले जात आहे. या या पूर्वीच भाजपा नेते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व आमदार गिरीश महाजन यांचे बविआ नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे.असे असताना बविआ नेमकी कोणाच्या बाजूने मतदान टाकते हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.
राष्ट्रवादीमधील काही बड्या नेत्यांकडून खडसेंना निवडून आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. व सर्व सूत्र आपल्याकडे घेतली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी थेट लढत होण्याची चिन्हे दिसून येत आहेत आपल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहे तसेच राष्ट्रवादीच्या काही नाराज आमदारांची देखील अजित पवार भेट घेत आहे. ज्या हॉटेल मध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना थांबवलेले आहे. त्या ठिकाणी देखील अजित पवार यांनी भेट देऊन आमदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली आहे. विरोधी पक्षाकडून होणारे आरोप-प्रत्यारोप यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे जर विधान परिषदेच्या सभागृहात आले तर राष्ट्रवादीची बाजू अधिक भक्कम होणार आहे. यामुळे उत्तर भारतात पक्षाला देखील अधिक बळ मिळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत खडसेंना विधानपरिषदेवर निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते कामाला लागले आहेत. आता यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची खेळी यशस्वी होते कि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खडसे यांना विधान परिषदेत रोखण्यात यश येते याकडे आता लक्ष लागून आहे. राजमुद्रा साठी कमलेश देवरे जळगाव