मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सतरा आमदार गुजरात मध्ये दाखल झाल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे राज्यात राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे काल रात्रीपासून निकालाआधीच मंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सर एकूण सतरा आमदार हे नॉट ट्रीचिबल झाल्याचे समोर आले आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांची एकनाथ शिंदे आज भेट घेणार आहेत गुजरातमधील सुरत येथील एका हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार तळ ठोकून आहे. या ठिकाणी रात्री तीन वाजेपर्यंत भाजपाच्या काही दिग्गज नेत्यांचा समवेत बैठक करण्याचीदेखील माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात काय नेमकी उलथापालथ घडते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
राज्यसभा निवडणुकीत दरम्यान मंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवारी देण्याबाबत विश्वासात घेतले गेले नाही यामुळे शिवसेना नेतृत्वाबाबत त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती, मात्र वेळोवेळी महाविकासआघाडी मध्ये सगळे आलबेल असल्याची प्रतिक्रिया नेते देत होते मात्र आज अचानक पणे एकनाथ शिंदे गुजरात मध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील सरकार मध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तवली गेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेने भाजप सोबत जावं अशी इच्छा शिंदें सह काही आमदारांची होती मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाकडून या विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आले व निवडणुका किंवा पक्षाच्या महत्त्वपूर्ण निर्णया मध्ये एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आले हीच नाराजी हेरून शिंदे हे गुजरात मध्ये दाखल केल्याचे देखील सांगितले जात आहे. गुजरात पोलिसांचा सुरत मधील ज्या हॉटेलमध्ये शिंदे 17 आमदार तळ ठोकून आहेत त्याठिकाणी गुजरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात राज्यात नवीन राजकीय समीकरणाची नांदी रोवण्याची चिन्ह दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील एक आमदार शिंदे यांचे सोबत
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत मुंबईमधील काही नाराज आमदार तर जळगाव जिल्ह्यातील एक आमदाराचा देखील समावेश असल्याचे सांगितले जात आहे. कारण जळगाव जिल्ह्यातील हा एक आमदार शिंदे यांच्या गटातील मानला जात आहे. मंत्रिपदाची उपेक्षा झालेल्या या आमदारांची नाराजी यानिमित्ताने देखील उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. शिंदे यांना गुजरात मध्ये जाण्यासाठी नेमकी शिवसेना पक्ष नेतृत्वाने संमती दिली ती खुद्द शिंदे गट हा गुजरात मध्ये दाखल झाला, याबाबत आता विविध चर्चा रंगत आहे मात्र शिंदे हे भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे शिंदे यांच्या अचानकपणे गुजरात दौऱ्या यामागे राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.