जामनेर येथील अनमोल अकॅडमि तर्फे दहावी परीक्षा २०२२ मध्ये विशेष प्रविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा व पालकांचा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला यामध्ये वैभव कोळी(प्रथम क्रमांक मराठी माध्यम),नितीन बेलदार (प्रथम क्रमांक इंग्लिश माध्यम),पवन पाटील (द्वितीय क्रमांक)
गोपाल पाटील (तृतीय क्रमांक )व विशेष प्रविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक अनमोल अकॅडमिच्या संचालिका माधुरी कुमावत यांनी केल. यावेळी महाराजांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की विद्यार्थी हा राष्ट्राचा पाया असून त्याच्याजवळ मेहनत जिद्द चिकाटी असली तर एक विकसित राष्ट्र होण्यासाठी मदत होते तसेच पालक व शिक्षक हे विद्यार्थी घडविण्याचे काम करत असतात महाराजांनी यावेळी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणीन्ना उजाळा दिला यानंतर पालकांमधून योगेश खोडपे, मनिषा पाटील व विध्यार्थी पवन पाटील, वैभव कोळी मान्यवरानतर्फे किशोर खोडपे,विवेक कुमावत, मनोज खोडपे,यांनी मनोगत व्यक्त केली. सरपंच कल्पना प्रकाश कुमावत, माजी उप सरपंच अशोक कोळी, ग्रामपंचायत सदस्य भगवान इंगळे, विकास कोळी, तुषार बिरारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वाघ सर, तुषार कुमावत, जागृती कुमावत, वैभव सोनावणे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रोकडे सर तर आभार जितेंद्र कुमावत यांनी मानले.