गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात मोठे वादळ उठले आहे, शिवसेनेतील नेत्यांनी बंडखोरपणा केल्यामुळे संपूर्ण शिवसेना ढासळत जातेय. अश्या पार्श्वभूमीवर या बंडखोर नेत्यांविरोधात ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, बंडखोर 38 आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे , यात ठाकरे सरकारने दिलेल्या यादीनुसार तब्बल 38 आमदारांची व त्यांच्या कुटुंबियांची सिक्युरिटी काढून घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यांनतर बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील त्याच सोबत पोलीस विभागाला पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला..
एकनाथ शिंदे यांनी ट्विट करता आपली भुमिका मांडली आहे , शिंदे म्हणाले , की “मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या आदेशाने राजकीय हट्टापायी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण ( सिक्युरिटी ) काढून घेण्यात आले आहे, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची संरक्षणाची जबाबदारी ही सरकार ची आहे ”
गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे. pic.twitter.com/gUn4JEyIJq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022